Ordinary People, Extraordinary Devotees Part-III

Shree Sakharam B Mehunkar

 

 

Born in 1901, died at 86 in 1986

Mrs Indira Sakharam Mehunkar

Born in1916 and died in 1997

Shri Shakaram Mehunkar and his wife Indira experienced Bhagavan Nityananda’s grace, which his daughter, Mrs Gaytri Waishampayan, shared. The original is in Marathi, which I have shared at the end of this post as it is. I translated the English version given below.

Mrs Gaytri Waishampayan

The First Darshan

When calamities befall humans, they remember God. But how He manifests and helps us often goes unrecognized. The Mehenkar family experienced this firsthand. After facing hardships, they found solace under the guidance and blessings of P.P. Nityanand Swami. His grace alleviated all troubles, and they attained happiness solely due to his blessings.

December 1952

Amidst anguish and distress, a glimmer of hope emerged. Following Shri Dhupkar’s suggestion, my parents visited P.P. Nityanand Swami at Ganeshpuri Sansthan in Vasai Taluka. Swamiji’s majestic appearance – dark-skinned, wearing a langot (loincloth), and possessing immense strength – left an indelible mark.

Devotees affectionately addressed him as ‘Baba.’ At that time, Ganeshpuri was a dense jungle. Baba transformed it into a thriving village, now known as Ganeshpuri.

He created numerous hot water springs, including Agnikund, Anusuya Kund, and Datt Kund, which attract devotees seeking spiritual solace and healing.

Miraculous Wonder

When my parents first visited Baba (P.P. Nityanand Swami), our situation was extremely dire. We had 19 months of overdue rent. My mother pleaded, “God, show me the way.” Baba pointed his finger and said, “Follow this straightforward path and practice devotion.” (Implied meaning: live an honest, straightforward life)

Upon returning home, my mother worried about what to do next. A court case regarding our house was pending. “What now?” she wondered. We visited Baba again, mentioning the court date. He instructed, “Don’t go home now.” The next day, the court date was postponed.

While bathing at the Kund (hot water spring), we met Dr. Deovdhar, another devotee of Baba and a TB specialist. After inquiry, he shared his address (Dadar TT, near Chitra Theatre) and invited us home.

By Baba’s grace, Dr Deovdhar generously paid our overdue rent of Rs. 400/- without our asking. Moreover, he supported us with Rs. 5/- every month for ten years. During those ten years, many calamities struck, but Baba’s blessings alleviated them all.

The Miracle of Clairvoyant Baba

Discussions about selling our home were underway due to financial constraints. One day, Baba appeared at our doorstep in the guise of a sadhu (ascetic). Only my father (Aanna) was home at the time.

The sadhu asked for coffee and my father offered him a wooden pat (seat) to sit. After surveying our home, the sadhu said, “Don’t sell this house” and vanished into thin air after drinking the coffee.

How did he know we were considering selling our home? This miraculous intervention by Guru Mauli (Baba) resolved our housing crisis.

Miraculous Experience

One day, a young beggar boy stood at our doorstep, hands folded, silently seeking alms. My father, annoyed, told him to leave, but the boy didn’t budge. After a while, my father grabbed a stick to chase him away, but his hand began to ache, and the stick slipped from his grasp. The boy vanished.

That night, my mother dreamed of the same boy, who appeared at our doorstep in the same manner. She asked in broken Hindi, “What’s your country? What’s your village?” The boy pointed to my father and asked, “Doesn’t he know his own country?”

Days later, my parents visited Ganeshpuri again and asked Baba, “Guru Mauli, when will you visit us?” Baba replied, “Why come? He chases me with a stick, doesn’t he?”

The sequence of events – the boy’s appearance, his reappearance in my mother’s dream, and Baba’s response – was nothing short of miraculous.

The Embodiment of the Supreme Brahman 

My father, Dr. Deovdhar, Mr. Ogale, and I performed puja at Ganeshpuri with Baba’s permission. Dr. Deovdhar and Mr. Ogale feared Baba, and whenever they faced difficulties, they’d ask my father to pray to Baba on their behalf. My father, being courageous, would tell Baba, “Baba, you may scold or beat me, but I won’t leave your feet.” Baba affectionately called my father “Damेकरi” due to his severe asthma, which was cured by Baba’s loving gaze and blessings.

After the puja, the three couples (Dr. Deovdhar, Ogale, and Mehunkar) stood before Baba with folded hands. Baba looked at them and asked my father, “Did you take up their cases? Can’t they speak? Can’t they ask?” My father replied, “The puja just ended, Baba.” Baba said, “Ended? Take this prasad!” and offered a new dhotar (cloth).

A scramble ensued as everyone wanted the prasad from Baba’s hands. Dr. Devdhar stepped forward, but Baba said, “Not you,” pointing to my father. The prasad went to my father. Baba then offered a piece of dhari (a type of cloth) from Dhawadi khan – a blouse piece offered to a married woman, but to whom? Baba glanced at everyone and gently tossed the khan onto my elder sister’s shoulder, which automatically went to my mother. There were three couples and among ladies, it would create an ill feeling if only one got this honour and the other two were to be left out. By giving it to Shri Mehunkar’s daughter, Bhagavan avoided such an unpleasant situation

This was how my father received the prasad and blessings from Baba. Later, my mother stitched the khan-cloth given by Bhagavan, into a blouse with her own hands, as we didn’t have a sewing machine. We were content, knowing Baba’s blessings and grace would always provide for us.

Manas Pooja – Mental Worship

My brother, three years older than me, was devoted to Baba’s feet at a tender age. He was exceptionally handsome, fair, and sturdy. Even in simple attire, he resembled Lord Dattatreya. His radiant complexion would change momentarily as if reflecting his inner thoughts. Mother would say, “We won’t see him grow up; his aura is constantly shifting.”

Baba adored him. At just two and a half years old, his articulate speech and thoughtful questions amazed everyone. He was our family’s precious gem.

One day, he asked Mother for Baba’s photo. Despite Father’s objections, Mother handed it over. He placed the photo against the wall, took some paper, tore it into tiny pieces, and used them as flowers at Baba’s feet. He’d ask Mother for jaggery (gur), which he’d gently rub on Baba’s photo, offering it as naivedya (offering – consecrated food). Then, he’d perform a profound namaskar (bow).

His name was Shrikrishna. After namaskar, Mother and Father would ask, “What did you tell Baba?” He’d reply, “Cure Anna’s asthma, keep everyone happy.” Next, he’d ask Mother for a japamala (prayer beads), put it around his neck, and sit cross-legged like Bhakta Dhruva.

When asked why he needed the mala, he’d say, “I chant Om Sadguru Nityanandaya!”

Later, Mother and Father took him to Ganeshpuri. Baba smiled and said, “I received this child’s Manas Pooja – mental worship and offering.” Our family felt blessed.

During the thread ceremony, Father prayed to Baba, “Bless my child’s munj (thread ceremony).” Baba remained silent, which was unusual. Later, Baba told the gathered devotees, “People have desires and aspirations, but this child has only 15 days to live.”

Exactly 15 days later, my brother fell severely ill with a high fever and passed away. Baba’s words had come true.

After his demise, Mother and Father returned to Ganeshpuri. Baba consoled them, “His samadhi (union with God) occurred. Don’t mourn; he’s become Dhruva. Don’t take his name, lest tears well up.” Baba reassured Mother, “Imagine the struggles you’d face if he grew up, studied, worked, married, and had children. You’ve borne him to alleviate the suffering of a brahmin family. Don’t grieve.”

Baba’s words brought solace, but a relative callously remarked, “One less mouth to feed at Mehunkar’s.” Mother remembered Baba’s words, which stayed with her forever.

In Parameshwara’s court there may be delay, but He never denies justice.

Bhakta Druva

I give briefly an introduction to Bhakta Druva:

Dhruva’s story, from the Vishnu Purana, is a profound lesson in surrender and devotion.

Dhruva, the son of King Uttanapada and Queen Suniti, was mistreated by his stepmother, Suruchi, who denied him the right to sit on his father’s lap, saying only her son, Uttam, was worthy. Hurt and ignored by his father, Dhruva sought solace in his mother, who told him that only Lord Vishnu could truly help him. Inspired by her words, the five-year-old Dhruva left home and went into the forest, determined to find Lord Vishnu.

As he chanted the mantra “Om Namo Bhagavate Vasudevaya,” Dhruva faced many challenges. Sage Narada tried to dissuade him, saying the forest was too dangerous, but Dhruva’s resolve grew stronger. Impressed by his devotion, Narada taught him how to meditate and guided him to Madhuvanam.

After intense penance and meditation, Lord Vishnu appeared before Dhruva. Overwhelmed by the divine vision, Dhruva could barely speak. Lord Vishnu, pleased by Dhruva’s unwavering devotion, lifted the boy onto his lap and blessed him. He told Dhruva that while he had to fulfill his duties on Earth as a king, he would one day live eternally as the Pole Star (Dhruva Nakshatra), a symbol of constancy and devotion.

Thus, Dhruva’s story shows that sincere devotion and perseverance can lead one to divine grace and eternal peace.

 

Ocean of Compassion

Due to dire circumstances, Mother and Father again visited Baba. They decided not to return home, but Guru Mauli (Baba) wouldn’t allow it. With no money, they couldn’t return home either. Dr. Deovdhar, who had come for darshan, received guidance from Baba and gave Mother and Father Rs. 5. Baba then told them, “Now, go home.”

Mother said, “What will I do at home? I won’t beg from anyone.” Baba replied, “Don’t ask anyone for anything, and if someone offers, decline. Just live on water, that’s all!” Mother and Father returned home.

From that day on, Mother never begged anyone for 40 years. Guru Mauli wouldn’t let her worries linger. The next day, a household member who usually came empty-handed arrived with half a kilo of biscuits, as if guided by Baba.

Thus, Guru Mauli again alleviated our crisis. Jay Nityanand.

Champion of the Poor

One day, Father told Mother, “I’ll take your thalipeeth (flatbread – Maharashtrian speciality) to Baba.” Our mother was an excellent cook. Accordingly, she made thalipeeth, and Father took it to Ganeshpuri.

Before Baba, Father stood humbly, hands folded like Sudama, and placed the thalipeeth box before him. He prayed, “Lord, I’ve brought thalipeeth for you; please accept it.”

Around Baba were boxes of sweets, fruits, and biscuits offered by devotees. Baba smiled, heard Father’s prayer, and graciously accepted one thalipeeth from the box.

Father and Mother were overjoyed. Such is our Baba, champion of the poor! Jay Parabrahma Nityanandaya Namaha.

God Gives, Karma Takes

Father worked as a LIC agent, but asthma hindered his policy sales. Once, he visited Baba, who said, “Go to the Rani of Mysore; she’ll give you a big policy.” We heard she was a devotee of Baba.

Father trusted Baba’s words and left. A man, familiar with Father, overheard Baba’s instruction and thought, “Mehunkar will become rich now, blessed by Baba.”

As Father left, the man followed and asked, “Mehunkar, are you heading to Mysore?” Father replied, “Baba ordered me to.” The man suggested, “First visit Chinchwad Ganapati, then go to Mysore; that’s how wishes are fulfilled.”

Father, being innocent and trusting, followed the advice. Upon arriving at Chinchwad, he received news of his brother’s demise. Baba’s command was clear: “Go,” but delaying obedience cost Father his son.

After completing funeral rites, Father went to Mysore, only to find the Rani on a hunting trip, returning in eight days. With no funds, he couldn’t wait. Father suffered an asthma attack and was hospitalized.

From the hospital, Father sent a telegram to Dr. Devdhar: “I want to return to Mumbai, but I have no money.” Dr. Devdhar sent funds, and Father returned to Mumbai. There, he and Mother visited Baba, who already knew everything.

Baba’s eyes turned red with anger, and he scolded Father, “You came late, now take this!” If only Father had left immediately, things would’ve been different. Such are the ways of fate! Jay Nityanand.

Joyful Joy Ensued

Baba showered extraordinary love and compassion on Father. Despite Father’s stubbornness, Baba scolded him with affection. Baba would say, “Stubborn, stubborn, my own don’t listen!” His eyes would twinkle with love.

After the Mysore incident, Baba affectionately called Father “Damakari” (asthma sufferer). “Come, sit,” Baba would say.

Earlier, Baba’s darshan would be closed for 2-3 days. Attendants would say, “Baba is resting, no darshan today.” Father, being stubborn, wouldn’t leave even if darshan was closed for 2-3 days.

He’d sit outside Baba’s door, vowing, “Until I see the Lord, I won’t drink water.” Baba, too, would test devotees. Baba instructed attendants, “Call Damakari inside.”

Thus, Father received Baba’s darshan. Om Nityanandaya Namah.

Time Came, but Moment Didn’t

We lived in Dadar. To reach Ganeshpuri, we’d take a train to Virar, then a bus. Father, like others, would often cross the railway tracks (dangerous and incorrect) to change platforms, as climbing stairs triggered asthma.

One evening, around 7-7:30, Father was crossing the tracks at Dadar station when a fast train with bright headlights approached. The platform crowd shouted, “Old man will die!” Suddenly, an invisible hand pulled Father aside, asking, “Do you want to die?”

After the train passed, people were stunned. Father stood trembling. The hand that saved him belonged to none other than Nityanand Baba. Baba revealed this in the next Ganeshpuri visit. Jay Nityanand.

Intuitive Baba

One day, Father visited Baba at Kailas and was returning home from Ganeshpuri bus stand, alone. He carried a cloth bag. As buses were infrequent, he waited. Suddenly, Dr. Devdhar rushed in and said, “Mehunkar, Baba has called you.”

Father returned to Kailas with Dr. Devdhar and stood before Baba with folded hands. Baba asked, “What’s in the bag?” Father replied, “Nothing, Lord, just four clothes.” Baba instructed, “Empty the bag.”

As Father turned the bag upside down, a large snake emerged, startling devotees. Baba calmed them and spoke to the snake, which slithered away. Baba said, “Now, go.”

Father had no idea there was a snake in the bag! Had it escaped during travel, people would’ve beaten him, leading to chaos. Baba’s kindness averted disaster.

Baba saved him from numerous physical and mental calamities. Our Lord is compassionate! Jay Nityanand.

The Experiences After Baba’s Samadhi

The experiences I’m about to share are from after Baba’s Samadhi. My father completed 2.5 crore (25 million) Purshcharan [repetitions of mantra] under Baba’s guidance. This involved chanting Baba’s name using a rosary. Father was around 75-76 years old and struggling with asthma, but he still managed to complete it.

He did this for our guru-brother, Shri Vamanrao Nayak, who was unwell. Despite our financial struggles, others helped us financially, inspired by Baba. My parents never asked anyone for help. Baba orchestrated everything.

For those who helped, Father went out of his way to assist them physically. He chanted mantras for them, shared their concerns with Baba, and never accepted anything free.

Our family members’ experiences after Baba’s Samadhi are remarkable. We were blessed with Baba’s company for 9 years. Even after Samadhi, Baba continues to guide us through visions and experiences. His presence is always felt at home.

What more could we ask for? Baba’s kindness has filled our lives with contentment, peace, and joy. Jay Nityanand!

A Divine Experience at Parshuram Temple

Near Ganeshpuri lies the Mandagiri mountain, home to Parshuram’s temple. The temple houses a stone idol, surrounded by hills and wilderness. Baba instructed, “Visit Parshuram’s temple.” Father prepared himself, despite his advanced age, asthma, and physical weakness.

After lunch, he began the arduous climb, chanting “Jay Nityanand” and taking breaks. As sunset approached, anxiety crept in – darkness, eerie sounds, and isolation overwhelmed him. The battery-powered light fell, and its glass cover cracked. Eventually, around 10 pm, he reached the temple.

Exhausted, he took his asthma medication and paid obeisance to Parshuram. As he began chanting Nityanand’s name, suddenly, someone appeared with lit torches, circumambulating the temple. Father was stunned, unsure what was happening. Wild animals seemed to be moving around; he fainted.

At dawn, he regained consciousness, miraculously unscathed. During his chanting, Parshuram appeared before him. Overjoyed, Father felt blessed. This was the power of Guru’s grace!

Before leaving home, he had said, “If I return safely, it’s your blessing; otherwise, it’s Baba’s will.” Trusting Baba’s guidance, he faced the test successfully.

Baba takes care of his devotees; we must have faith in his words. Such is our beloved Baba! Jay Shri Nityanand!

The Time Had Come, But the Moment Wasn’t

This experience occurred after P.P. Nityanand Baba’s Samadhi. My father consistently chanted Baba’s name. From May 1971 to 1973, he resided in “Vaikunth,” a house near the police building in Ganeshpuri, to focus on chanting.

After Baba’s passing, he appeared to my father repeatedly, showering him gracefully. One night, while Father was chanting, he dozed off due to old age and exhaustion. When he woke up at dawn, he found the door wide open, which was previously locked from the inside.

A colossal, dark-complexioned figure stood outside, asking, “May I enter?” Father fainted upon seeing him. When he regained consciousness, he saw Baba standing before him, and a loud voice in Hindi warned, “Beware, whoever dares to harm my devotee!” Baba smiled, looked at Father, and said, “Don’t share this with anyone,” gesturing to keep it secret. The bed was damp because Baba had come directly from his morning bath at the kund (water tank). What concern he showed for his devotees! At that moment, “time” (death) had arrived for Father, but his “moment” (appointed time) hadn’t.

Baba thus granted Father a second lease on life, previously saving him once when he was crossing railway tracks. Blessed be our Guru! Jay Shri Nityananda

Passing away of Shri Mehunkar

“December 5, 1986, was a sorrowful day in our lives. My father bid farewell to this world. He left on Margashirsha Chaturthi, which fell on the first Thursday of the month.

On the 10th day, we went to the crematorium’s rest house for the Pind Daan ceremony, where the rituals were being performed. Notably, the rest house had pictures of various deities, and remarkably, the rituals were conducted right below P.P. Nityanand Baba’s photo.

Our eyes welled up with tears of joy, as if Baba was reassuring us, “Don’t grieve; he has merged with my feet.” We felt immense bliss.

We didn’t have to wait for the Pind either, as a crow swooped in to claim it instantly.

The 13th day coincided with Datt Jayanti, marking the completion of the rituals. Every day since my father’s passing was auspicious.

My father was indeed blessed.

We offer our heartfelt tributes to our beloved late father.

Jay Shri Nityanand”

Marathi Version

माणसांवर संकटे आली म्हणजे देव आठवतो. तो कशा स्वरूपात प्रकट होऊन आपणांस मदत करतो हे कळतही नाही .
असे अनुभव संकटात सापडल्यानंतर “मेहुणकर ” कुटुंबियांना आले आहेत .प .पू.नित्यानंद स्वामींच्या वरदहस्ताने व कृपा दृष्टीने सर्व संकटांचे परिमार्जन झाले . केवळ त्यांच्या आशीर्वादानेच परिपूर्णतेने सुखी आहोत .

सन – १९५२ . महिना – डिसेंबर

रंजलेल्या , गांजलेल्या अशा पीडित मन:स्थितीत असताना एक आशेचा किरण दिसला . आमच्या नात्यातील परळ येथील श्री.धुपकर ह्यांचे सांगण्यावरुन वसई तालुक्यातील गणेशपुरी संस्थांमधील प.पू . नित्यानंद स्वामी यांचे दर्शनाला माझे आई – वडील ( वडीलांना आम्ही आण्णा म्हणत असू ) दर्शनाला गेले .

कृष्णवर्णीय, लंगोटी नेमलेले ,
अजानबाहु अशा नित्यानंद स्वामींचे दर्शन झाले .त्यांना सर्व भक्तगण बाबा या नावाने संबोधित . त्याकाळी गणेशपुरी हे जंगलच होते .अशा ह्या जंगलाला गावाचे स्वरुप देऊन या नव्या गावाला गणेशपुरी हे नाव दिले . तेथे अनेक गरम पाण्याची कुंडे बाबांनी निर्माण केली . अग्नीकुंड ,अनुसुया कुंड , दत्त कुंड अशी अनेक कुंडे तेथे आहेत

अद्भूत चमत्कार.

माझे आई -वडील प्रथमच बाबांचे दर्शनाला गेले . परिस्थिती अतिशय हलाखीची होती . १९ ( एकोणीस ) महिन्यांचे घरभाडे थकीत होते .‌माझी आई म्हणाली,” देवा , मला मार्ग दाखव” त्यावर गुरुमाऊली ( बाबा ) बोट दाखवून म्हणाली , ” ह्या सीध्या रस्त्याने जा व भक्ती कर.” ( ह्याचा अर्थ जीवनात प्रामाणिक , सरळमार्गी वागणे ) घरी आल्यावर काय करावे या चिंतेत आई पडली .कोर्टात घराबाबत केस लागली . आता काय करावे ? हा प्रश्न उभा राहिला व पुन्हा दर्शनाला गेले .” उद्या कोर्टाची तारीख आहे ” हे सांगताच “आता घरी जायचे नाही ” असे बाबांनी सांगितले . दुसरे दिवशीची कोर्टाची तारीख टळली .

दुसरे दिवशी कुंडावर आंघोळीला गेले असता त्यांचे दुसरे भक्त डॉ.देवधर ( जे टीबी स्पेशियालिस्ट ) तेथे भेटले . तुम्ही कोण , कोठले वगैरे चौकशी केल्यावर त्यांनी त्यांचा पत्ता दिला व घरी आग्रहाने बोलावून घेतले .
( ते दादर टीटी , चित्रा थिएटर शेजारीच रहात होते ) त्यावेळी त्यांनी गुरु माऊलींच्या कृपेने स्वबुध्दीने आम्ही न मागता थकीत घर भाड्याने रु. ४००/- आम्हाला दिले . इतकेच नाही तर दर महिन्याला रु.५/- प्रमाणे डॉ.देवधरांनी आम्हाला दहा वर्षे मदत केली. त्या दहा वर्षांच्या कालावधीत अनेक संकटे आली . ती गुरु माऊलींच्या कृपेने टळली

मनकवडे बाबा

राहती जागा विकणेच्या संदर्भात घरी बोलणी सुरु झाली .

एक दिवस ” बाबा ” साधू रुपात आमचे घरी आले .घरात
आण्णांव्यतिरिक्त कोणी नव्हते .साधू रुपात येऊन त्यांनी coffee ची मागणी केली. वडिलांनी घरात त्यांना बसायला पाट दिला . ते बसले . सर्व घर न्याहाळीत म्हणाले , ” घर सोडायचे नाही ” असे सांगून coffee पिऊन अदृष्य झाले .
त्यांना कसे समजले की आमचे कडे घर विकणेची बोलणी सुरु आहेत म्हणून !
अशा प्रकारे हे घराचे संकट गुरु माऊलींनी निवारण केले .

अद्भूत अनुभव

एके दिवशी एक भिक्षेकरी लहान मुलगा दरवाजासमोर काहीही न मागता नुसते हात जोडून उभा राहिला .ब्राह्मण रुपातील त्या मुलाला आण्णांनी तू ” पुढे जा ” म्हणून सांगितले . तरीही तो हलेना .बराच वेळ दाराशी थांबून राहिला . शेवटी तो हलत नाही असे पाहून आण्णांनी काठी काढली .आई अण्णांना म्हणाली , ” जरा थांबा , मी तांदूळ देते ! अण्णांना राग खूप यायचा. आण्णांनी काठीने मारणेसाठी हात उगारला , पण हात दुखू लागला व काठी गळून पडली . तो मुलगा निघून गेला .

त्याच दिवशी रात्री आईचे स्वप्नात तोच मुलगा , त्याच पध्दतीने दाराशी आला .आईने त्याला तोडक्यामोडक्या हिंदी भाषेत विचारले , ” तुझा देश कोणता ? तुझा गाव कोणता ?
माझे वडीलांकडे बोट करुन त्याने उलट प्रश्न केला की ; माझा देश कोणता हे ह्याला माहित नाही ?

काही दिवसांनी आई – आण्णा पुन्हा गणेशपुरीला गेले व त्यांनी बाबांना विचारले ,
“गुरुमाऊली आता आमचेकडे कधी येणार ? ” यावर गुरुमाऊली म्हणाली , ” कशाला येऊ ? हा काठी घेऊन माझ्या मागे लागतो नां !”

तो मुलगा ब्राह्मण रुपाने दारावर येणे , तोच मुलगा रात्रौ आईचे स्वप्नात येणे व गुरू माऊली कडून तेच उत्तर ऐकायला मिळणे ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे चमत्कारच नाही कां ?

साक्षात परब्रह्म

आम्ही , आमचे गुरुबंधू डॉ.देवधर व श्री.ओगले असे मिळून बाबांचे परवानगीने गणेशपुरी येथे पूजा घातली . ते दोघेही बाबांना घाबरत असत . त्यांची कोणतीही अडचण असली तरी ते माझे वडीलांना सांगत असत की , ” मेहुणकर ( आमचे आडनांव ) बाबांना आमचे बद्दल विचारा , प्रार्थना करा . माझे वडील धीट होते. . ते बाबांना म्हणायचे बाबा , तुम्ही मला मारा , झोडा पण मी तुमचे पाय कधीच सोडणार नाही . पायाशी बसून रहायचे .आण्णा कधी डॉ.चे विषयी , कधी ओगलें विषयी बाबांना अडचणी विचारायचे . हे
नेहमीचेच व्हायचे . एक दिवस बाबा आण्णांना म्हणाले , तू ह्यांचे वकीलपत्र घेतले आहेस ? त्यांना विचारायला तोंड नाही ? त्यांना बोलता येत नाही ?बाबांनी माझे वडीलांचे नांव ” दमेकरी ” असे ठेवले होते. कारण त्यांना भयंकर अस्थमा होता ,पण बाबांचे प्रेमळ दृष्टीने व कृपेने बरा झाला होता .
असे आमचे प्रेमळ बाबा !

तर पूजेची समाप्ती झाल्यावर ही तीनही जोडपी ( डॉ.देवधर , ओगले व मेहुणकर ) बाबांपुढे हात जोडून नमस्कारासाठी उभी
राहिली . बाबांनी सर्वांकडे पाहिले . आण्णा म्हणाले ,” बाबा ,
आत्ताच पूजा आटोपली .बाबा म्हणाले हूं , आटोपली ? हा घ्या प्रसाद ! असे म्हणून एक धोतराचे नवीन पान ह्या तिघांसमोर टाकले . आता हा बाबांचा हातचा प्रसाद कोणी घ्यायचा ? चुळबूळ
सुरु झाली . डॉ. देवधर थोडे पुढे सरसावले. तेव्हढ्यात बाबा म्हणाले, ” तुला नाही , ” त्याला ” माझे आण्णांकडे बोट दाखवून म्हणाले .तो प्रसाद अण्णांना मिळाला .जोडपी उभी राहिल्याने
सुवासिनीलाही द्यावे लागते . बाबांनी धारवाडी खणाचा तुकडा
काढला . आता ह्या तिघीत हा कोणाला ? बाबा अतिशय चतुर ! त्यावेळी माझी मोठी बहिण आईचे हाताकडे उभी होती . बाबांनी एकवार सर्वांकडे पाहिले व तो खण बहिणीचे अंगावर टाकला . त्यामुळे तो आपोआपच आईला मिळाला . अण्णांच्या जपाचा प्रसाद अशाप्रकारे मिळाला .त्यानंतर त्या खणाचा ब्लाऊज आईने स्वतःच्या हाताने शिवून घातला .आमचेकडे शिवणाची मशिन नव्हती . आम्हा
सर्वांना बाबांचे हातचा कपडा , खाऊ मिळाल्याने आम्हाला उभ्या
आयुष्यात कपड्यांची व खाण्याची ददात पडली नाही व पडतही नाही . आम्ही तृप्त आहोत .बस्स ! आम्हाला फक्त
बाबांचे आशीर्वाद व कृपादृष्टीच
हवी आहे .

मानसपूजा

माझे पेक्षा तीन वर्षाने मोठा मला भाऊ होता . तो त्याच्या वयाच्या अडीयचाव्या वर्षी बाबा चरणी लीन झाला .

तो दिसावयास अतिशय सुंदर होता .गोरा गोरा पान व सुदृढ होता .त्याला फाटका पंचा नेसविला तरी नुसता दत्तासारखा
दिसायचा .त्यांची कांती ( स्कीन ) फार सुरेख होती .आई नेहमी अण्णांना म्हणत असे की ; “ह्याच्या मोठेपणी आपल्याला ह्याचेकडे पहावणार नाही , कारण त्याची कांती ( तेज )क्षणाक्षणाला बदलायची “. त्याला बाबांचे अतिशय प्रेम होते .अडीच वर्षांचे पोर ज्याचे खेळाबागडायचे दिवस ! बरे , ह्या वयातील त्याचे सुस्पष्ट बोलणे , त्याचे विचार अचंबित करणारे होते .तो म्हणजे आमचे घरातील हिरा होता .

एक दिवस तो आईला म्हणाला , ” आई , आई मला बाबांचा फोटो दे . आण्णा रागवायचे की फोटो देऊ नकोस , तो लहान आहे , खराब करेल . तरी आईने त्याला फोटो दिला .तो
फोटो त्याने जमिनीवर भिंतीला टेकवून ठेवला .मला कागद दे . कागद दिला की त्याचे बारीक बारीक तुकडे करी व फुले म्हणून बाबांचे फोटोच्या पायापाशी वहात
असे .मग आई , गूळ दे ना !ते बघ बाबा मागत आहेत . असे म्हटल्यावर आई गुळाचा खडा देई .एखाद्या लहान मुलाला गूळ दिल्यावर तो खाऊन टाकेल , पण तो गूळाचा खडा घेऊन तसबीरीच्या तोंडावर घासत असे . कां तर नैवेद्य म्हणून हो !
आणि मग ब्राह्मणी पध्दतीचा साष्टांग नमस्कार घाली .त्याचे नांव श्रीकृष्ण ठेवले होते . नमस्कार घालून झाल्यावर आई-आण्णा विचारीत , ” काय सांगितलं बाबांना ? ” तर म्हणत असे , ” माझ्या आण्णांचा दमा बरा कर , सगळ्यांना सुखी ठेव “.
नंतर आईकडे जपाची माळ मागत असे . ती दिली की स्वत:घ्या गळ्यात घालून ध्रुवबाळासारखा मांडी घालून बसायचा . तुला माळ कशाला हवी ? विचारले की म्हणायचा , मी ॐ सद्गुरू नित्यानंद म्हणतो नां !

पुढे आई-आण्णा भावाला घेऊन गणेशपुरीला गेले . बाबांनी सर्वांना पाहिले व हसून म्हणाले ,
” ह्या मुलाची मानसपूजा मला मिळाली , नैवेद्य मिळाला आई-आण्णांना खूप आनंद झाला . परमेश्वराकडून इतकी पावती मिळाली , अजून काय पाहिजे ? ”

कैलास भुवन सभागृह भक्तांनी गच्च भरलेले होते . बाबा तेथेच बसले होते . नेहमीप्रमाणे आमचे कुटुंबही तेथे होते .तेव्हा आण्णा माझे भावाला घेऊन बाबांपुढे हात जोडून प्रार्थना करू लागले की ; ” देवा ,ह्या माझ्या मुलाची मुंज ( थ्रेड सेरीमनी ) मी तुमचे पायाकडे करणार आहे , आशीर्वाद द्या .” त्यावेळी बाबा काहीच बोलले नाहीत .नाहीतर हूं म्हणून आशीर्वाद देत असत . दर्शन घेऊन आई-आण्णा भावाला घेऊन घरी ( दादरला ) यायला निघाले. बाबांनी बसलेल्या भक्तगणांना सांगितले की ; ” काय माणसांच्या आशा असतात , आकांक्षा असतात , हे बालक तर फक्त १५ दिवसांचेच आहे .” पुढे १५ दिवसांचीच माझे भावाला शरीराचे आतून-बाहेरून भरपूर देवी आल्या व ताप आला .नुसता देवीने फुलून गेला होता . गोरापान असल्याने लाललाल दिसत होता व त्यातच त्याचे देहावसान झाले . बाबांची वाणी सत्य ठरली.
नंतर तेथील भक्तांनीच अण्णांना बाबा काय म्हणाले होते ते सांगितले .

त्याचे खेळ म्हणजे पुस्तक हातात स्टाईलमध्ये धरून आईला म्हणायचा , आई मी शाळेत जाऊन येतो . घराला लागूनच जिना आहे . तेथपर्यंत जायचा व परत यायचा . थोड्या वेळाने कोलेज कुमारासारखे ऐटीत हातात पुन्हा पुस्तक घेऊन मी कोलेजला जाऊन येतो . हे शब्द त्याला कोण शिकवीत होते ?
लहानपणातच तो मोठेपणाची कृती करून दाखवायचा . एके दिवशी आईने भावाला गडबड करीत होता म्हणून हळूच चापट दिली .तर अजिबात रडला नाही
व ताठ उभे राहून आईला म्हणतो कसा , ” तू मला मारतेस ? मी
बाबांकडे जाऊन बसेन हं ! आणि
थोड्याच दिवसात तो गुरु चरणी
लीन झाला .

आई-आण्णा तो गेल्यानंतर पुन्हा बाबांचे दर्शनाला गणेश पुरीला गेले .आई तर दु:खाने व्याकुळ झाली होती. माताच ती !
आण्णांची तर वेड्यागत अवस्था झाली होती . आई-आण्णांना पाहिल्याबरोबर बाबा म्हणाले ,
” झाली बालकाची समाधि ? समाधि हा शब्द सामान्य माणसाला लागू नाही . तो ध्रुव होऊन बसला आहे. त्याचे
नावाने डोळ्यात पाणी आणायचे नाही .बाबा अण्णांना म्हणाले , तुला पहायचा आहे ? माझेकडे तो खेळतो आहे. नंतर आईचे सांत्वन
बाबांनी सुंदर शब्दांनी केले .ते आईला म्हणाले की ; ” तो शाळेत गेला असता , कोलेजला गेला असता , खूप शिकला असता , नौकरी केली असती , लग्न झाले असते , मुलेबाळे झाली असती आणि असा मोठा होऊन गेला असता तर अम्मा , तुला किती यातना झाल्या असत्या ? तो राजयोगी ( राजपुत्र ) होता. पुत्र
शोकासाठी तुझे गरीब ब्राह्मणाचे पोटी जन्माला आला . दु:ख करु नका .” अशी ही बाबांची शिकवण , सांत्वन करणेची पध्दती ! नाहीतर आमचेच नातेवाईक ( माझे सख्ख्या मावशीचे यजमान जे आयुर्वेदिक डॉक्टर होते ) भाऊ गेल्याचे ऐकल्यावर म्हणाले , ” चला ,
मेहुणकरांकडील एक खाणारा कमी झाला .कारण आमची परिस्थिती फार बिकट होती नां ?
पण त्यांचे वाक्य आईचे हृदयात कायमचे राहिले . पुढे त्यांची वृध्दापकाळी शारिरीक स्थिती इतकी खालावली की दोन मुलगे
असूनही कोणी विचारेना . असो . परमेश्वराच्या दरबारात देर है , अंधेर नहीं | हेच खरे .

तर असे हे आमचे बाबा !

कृपेचा सागर

परिस्थिती गंभीर असल्याकारणाने पुन्हा आई-आण्णा बाबांचे दर्शनाला गेले . फिरुन घरी जायचे नाही असे ठरविले . पण गुरुमाऊली तेथे राहू देते कां ? जवळ पैसा नसल्याने घरी येऊ शकत नव्हते .
डॉ.देवधर दर्शनाला आलेच होते .
बाबांनी त्यांना बुध्दी दिली व त्यांनी आई-आण्णांना रू.पांच ( रू.५/- ) दिले .लगेच गुरुमाऊली म्हणाली , ” आता तू घरी जायचस “. आई म्हणाली की; ” मी घरी जाऊन काय करु ?
मी कोणाकडे उसन ( कोणापुढे हात पसरणार नाही ) मागायला जाणार नाही .” यावर गुरुमाऊली
म्हणाली , ” कुणाकडे काही मागायचं नाही आणि कोणी ( स्वतःहून ) दिलंच तर नाही म्हणायचं नाही , पाणी पिऊन
रहायचं , बस्स ! ” पैसे नाहीत हे कारण सांगता आले नसते कारण डॉ.नी अडचण दूर केली होती .मग आई आण्णा घरी आले . त्या दिवसापासून आई ४० वर्षे कोणाकडेही वाटी घेऊन उसन मागायला गेली नाही . गुरुमाऊली
पाण्यावर थोडीच ठेवणार ? तिलाच काळजी !

दुस-या दिवशी नेहमी येणारे कधीही काहीही न आणणारे गृहस्थ ( रिकाम्या हातानेच येत असत ) त्या दिवशी सकाळी अर्धा किलो बिस्कीटे घेऊन आले . बाबांनीच त्यांना बुध्दी दिली . अशा प्रकारे गुरुमाऊलीने पुन्हा एकदा आमचेवर आलेले संकट टळले .

गरीबांचे कैवारी

एकदा आण्णा आईला म्हणाले की; तुझे हातचे थालीपीठ मी बाबांसाठी घेऊन जातो . आमची आई सुगरण होती . त्याप्रमाणे आईने थालीपीठे केली व ती घेऊन आण्णा गणेश पुरीला गेले .बाबांसमोर हात जोडून सुदाम्यासारखे आण्णा बाबांपुढे उभे राहिले. थालीपीठाचा डबा बाबांसमोर ठेवला व प्रार्थना
केली की ; देवा , मी आपले साठी थालीपीठ आणले आहे , आपण ते खावे .बाबांचे आजूबाजूला मिठाईचे बोक्स , फळे , बिस्कीटांचे डबे भक्तांनी आणून ठेवलेले होते . बाबांनी अण्णांची प्रार्थना ऐकली व हसत-हसत डब्यातील एक थालीपीठ ग्रहण केले .अण्णांना / आईला खूप आनंद झाला . असे आहेत आमचे बाबा ! गरीबांचे कैवारी !

दैव देते कर्म नेते

आण्णा एल.आय.सी.त एजन्ट म्हणून नौकरी करीत होते .परंतु अस्थमामुळे त्यांचेकडून फिरुन policy मिळवावयाची कामे होऊ शकत नव्हती .

ते एकदा बाबांचे दर्शनाला गेले असता बाबा अण्णांना म्हणाले की ; ” तू म्हैसूरच्या राणीकडे जा , ती तुला मोठी policy देईल .” ती राणी बाबांकडे दर्शनाला यायची असे ऐकले आहे . बाबांचे
शब्द ! मग काय विचारता ! बाबांनी सांगितल्या बरोबर त्यांचे आज्ञेचे पालन झाले पाहिजे . आण्णा हो म्हणाले व नमस्कार करून निघाले .बाबांचे बोलणे एका माणसाने ऐकले . तो अण्णांना ओळखत होता .त्याच्या
मनात किंतू आला की ; झाले !
आता मेहुणकर श्रीमंत होणार ,
बाबांचा आशीर्वाद मिळाला आहे.
आण्णा बाहेर पडल्या बरोबर तो
त्यांचे मागोमाग बाहेर आला व
अण्णांना म्हणाला , काय मेहुणकर , म्हैसूरला निघालात ?
आण्णा म्हणाले , हो , बाबांची आज्ञा आहे , गेलेच पाहिजे . त्यावर तो विघ्नसंतोषी म्हणतो कसा ? तुम्ही कधी चिंचवडच्या
गणपतीला गेला आहात कां ? तो
नवसाला पावतो .म्हैसूरला जाणे-
आधी तेथे जा व मग म्हैसूरला जा. कशी भुरळ पडते ! आण्णा खूप भोळे व निरागस होते . फारसा विचार करीत नसत . समोरच्या माणसावर पट्कन विश्वास ठेवीत असत .आण्णांनी प्रथम तसे केले . चिंचवडला गेले
आणि त्याचवेळी घरी भावाचे देहावसान झाले .बाबांनी निघ म्हटले की निघालाच पाहिजे .
त्यांच्या आज्ञेचे पालन न केल्याने त्यांना मुलगा गमवावा लागला .चिंचवडहून बोलावून घेतले व मुलाचे अंत्यविधी आटोपून नंतर आण्णा म्हैसूरला गेले . तेथे गेल्यावर कळले की ;
राणी सरकार शिकारीला गेल्या आहेत .८ दिवसांनी येतील . ८
दिवस थांबणे शक्य नव्हते . कारण जवळ पैसा नव्हता . तेथे गेल्यावर त्यांना दम्याचा एटेक आला . कोणीतरी त्यांना तेथें
होस्पिटलला एडमिट् केले.
होस्पिटलमधून आण्णांनी डॉ.देवधरना तार पाठविली की ; मला मुंबईला यायचे आहे , पण माझेकडे पैसे नाहीत . डॉ.नी पैसे
पाठविल्यानंतर आण्णा मुंबईत आले. आल्यावर आई-आण्णा
बाबांचे दर्शनाला गेले. बाबांना सर्व ठाऊकच होते. बाबांचे डोळे
रागाने लाल झाले. मोठे डोळे करून अण्णांना ओरडले . म्हणाले , ” आलास ना हात हलवित , आता घे घंटा ! ”

आण्णा बाबांचे आज्ञेनुसार
ताबडतोब गेले असते तर ! ह्या जरतरच्या गोष्टी ! असो.
जय नित्यानंद

आनंदी आनंद जाहला

आण्णांवर बाबांचे विलक्षण प्रेम ! खूप कृपादृष्टी .आण्णांवर बाबा कितीही रागावले तरी पुन्हा मायेने बोलत असत . कृपेचा सागरच तो ! आण्णा अतिशय हट्टी होते .आईने आण्णांविषयी बाबांकडे तक्रार केली की ह्यांना काही समजवा , ऐकत नाहीत .
तर बाबा म्हणत , हट्टी , हट्टी माझेच ऐकत नाही. हे म्हणताना देखील प्रेमळ दृष्टी असायची .( कारण नुकताच
म्हैसूरचा प्रकार घडला होता ) त्यांना ” दमेकरी ” म्हणून बाबा उल्लेख करायचे . आलास ? बैस
म्हणत असत . पूर्वी बाबांचे २/३
दिवस दर्शन नसायचे .त्यांचे सेवेकरी सांगायचे, ” बाबा सो रहे है , दर्शन नहीं होगा ” आण्णा हट्टी ! त्यांना २/३ दिवस दर्शन झाले नाही .बाबांचे खोलीबाहेर आण्णा तसेच बसून राहिले.दर्शन
होत नाही देवा , तोपर्यंत मी पाणी तोंडांत घालणार नाही अशी प्रतिज्ञा करुन तसेच दरवाजा बाहेर थांबले .( कैलासच्या मागील दरवाजात जेथे बाबांची खुर्ची असायची त्या दरवाजा बाहेर ) बाबा देखील भक्तांची परीक्षा पहातात .

बाबांनी सेवेक-यांना सांगितले
की ; ” बाहेर दमेकरी बसलाय , त्याला आत पाठव .” अशा प्रकारे आण्णांना बाबांचे दर्शन झाले

काळ आला पण वेळ आली नव्हती

आम्ही दादरला रहातो .
गणेशपुरीला जाणेसाठी प्रथम विरार गाडीने जाऊन पुढे एस.टी.ने प्रवास करावा लागतो . तसे जाताना आण्णा बहुदा इतरांबरोबर रेल्वे लाईन क्रोस करुनच ( जे अतिशय धोकादायक व चुकीचे आहे ) प्लैटफोर्म बदली करीत असत .कारण जिना चढून गेल्यावर त्यांना दम्याचा त्रास होऊन दम लागायचा .

एकदा सायंकाळी ७ / ७.३० ची वेळ होती. आण्णा गणेशपुरीहून दादर स्टेशनवर आल्यानंतर प्लैटफोर्म बदलणे साठी रेल्वे लाईन ओलांडीत होते . त्यावेळी कोणतीही गाडी येत नव्हती . इतक्यात एक फास्ट
थ्रू ट्रेन जिचे प्रखर दिवे पेटलेले की
ज्यामुळे अण्णांना कळेना की गाडी आपण ओलांडीत असलेल्या रूळावरुनच येतआहे .
प्लैटफोर्मवरील सर्व लोक ओरडायला लागले , ” बुढ्ढा मर गया “! अचानक एका अदृष्य व्यक्तीने अण्णांचे हाताला धरुन
जोरात बाजूला केले व मरायचे आहे कां ? विचारले .गाडी धाड्धाड निघून गेल्यावर लोका अचंबित झाले . आण्णा थरथरत
उभेच होते .
हात देणारी व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नव्हती तर आमचे नित्यानंद बाबाच होते .हे समजले कसे तर पुढच्या गणेशपुरीच्या भेटीत बाबांनीच उलगडा केला

अंतर्ज्ञानी बाबा

एकदा आण्णा कैलास मधून बाबांचे दर्शन घेऊन घरी येणे साठी गणेशपुरीच्या बसस्टैंडला आले व बसले . त्यावेळी घरची मंडळी कोणी नव्हती , ते एकटेच होते .हातात एक कापडी पिशवी होती .बराच वेळ बस आली नाही . त्यावेळी बसेस कमी असायच्या . फार वेळ लागत असे . तेव्हढ्यात डॉ.देवधर पळत पळत स्टैंडवर आले व अण्णांना म्हणाले , ” मेहुणकर , चला , तुम्हाला बाबांनी बोलाविले आहे .”आण्णा परत त्यांचे बरोबर कैलासमध्ये आले व बाबांपुढे हात जोडून उभे राहिले . बाबांनी पाहिले व विचारले , पिशवीत काय आहे ? आण्णा म्हणाले , काही नाही देवा , ४ कपडे आहेत . पिशवी उलटी करुन मोकळी कर . आण्णांनी तसे केले . त्याबरोबर पिशवीतून मोठा लांबलचक साप बाहेर पडला . भक्तांची घाबरगुंडी झाली . बाबांनी सर्वांना शांत केले व सापाशी काही बोलले .साप निघून गेला . बाबा अण्णांना म्हणाले , पो पो . आता जा .आण्णांना ह्याची सुतराम कल्पनाही नव्हती की पिशवीत साप आहे म्हणून !
समजा प्रवासात गाडीत काही गडबड झाली असती तर लोकांनी अण्णांना मारहाण केली असती व
अनर्थ घडला असता . बाबांच्या कृपादृष्टीने हे संकट टळले .अशी अनेक शारीरिक , मानसिक संकटातून बाबांनी बाहेर काढले आहे .किती दयाळू आपला देव !

आता जे अनुभव लिहिणार आहे ते बाबांचे समाधि नंतरचे आहेत .

माझे आण्णांनी अडीच कोटींचे पुरश्चरण केले आहे . म्हणजे काय तर अडीच कोटीचा ( २|| कोटी ) जप जे माळेने नामस्मरण करतात तो बाबांनी करवून घेतला आहे . बाबांच्याच नावाचा जप केला आहे .‌त्यावेळी त्यांचे साधारण ७५/७६ असे वय होते . दम्याचे आजारपणात शरीर थकले होते .तरीही त्यांनी केले . हा जप आमचे गुरुबंधू श्री.वामनराव नायक ह्यांची तब्येत ठीक नसायची , तर त्यांचेसाठी केला .भले आमच्या परिस्थितीत इतरांनी आम्हाला पैशांची मदत करीत ते बाबांच्या प्रेरणेनेच ! आई-आण्णांनी कोणापुढे ही कधी हात पसरले नव्हते . बाबांचं सर्व लीला करीत असत . ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे साठी आण्णांनी शारिरीक कष्ट खूप करून मदत केली आहे . जसे कोणासाठी जप करणे , बाबा असताना त्यांच्या अडचणी बाबांना सांगणे . फुकट काहीही घेतले नाही . यापुढील आमच्या कुटुंबातील सदस्यांचे अनुभव
बाबांनी समाधि ठेवल्यानंतरचे आहेत .९ वर्षे बाबांचा सहवास मिळाला . पुढील आयुष्यात आजपर्यंत बाबांनी दृष्टांत देऊन किंवा नाविन्याने अनुभव देतच आहेत . सतत बाबांचा वास घरात आहेच . अजून काय पाहिजे ?
बाबांचे कृपेने समाधान , शांती , आनंद या सर्व गोष्टींनी आम्ही
परिपूर्ण आहोत .

Mandakini Parvat & Shree Parshuram

गणेशपुरीहून जवळच मंदागिरी पर्वत आहे. तेथे परशुरामाचे मंदिर आहे .मंदिर म्हणजे दगडी मूर्ती आहे . आजूबाजूला सर्व डोंगर व ओसाडच आहे .

परशुरामाचे दर्शन घे अशी बाबांची आज्ञा झाली .मग काय विचारता , आण्णांची जय्यत तयारी सुरू! एव्हढा मोठा डोंगर चढून जायचा होता. वयही झाले होते .दम्याचा त्रास होताच . परंतु गुरु आज्ञेपुढे अण्णांना कसलीही तहान-भूक नव्हती .

दुपारचे जेवण करुन ( त्यावेळी डोंगराच्या पायथ्याशी व गावात मुळे रहातात . आता कोणी रहाते की नाही माहीत नाही . आण्णा त्यांचेकडे जेवले .
उन्हे उतरायला लागल्यानंतर डोंगर चढायला सुरुवात केली .ब-याच ठिकाणी उठ-बस करीत ” जय नित्यानंद ” नामस्मरण करीत करीत चढत राहिले .संध्याळ झाली . म्हणता म्हणता उन्हं संपली व काळोखाचे आपले साम्राज्य दाखवायला सुरुवात केली. मात्र त्यावेळी अण्णांना भिती वाटू लागली . कारण आजूबाजूला झाडी , काळोख , रातकिड्यांचे किरर् आवाज ! मनुष्यातून निर्मनुष्यात आल्याचे जाणवले .
झाडांकडे सळसळ्याचे आवाज येऊ लागले . बरोबर बाटलीतून आणलेले पाणीही संपत आले . हातातील बैटरी २/३ वेळा खाली पडली .ती शोधून कशीतरी सापडली .बैठकीची वरील काच फुटली .अखेर रात्री किती वाजले यांचा अंदाज नाही, परंतु १० वा.चे पुढे त्यांनी परशुराम मंदिर गाठले . चारी बाजूने मोकळे , थंड हवामान ! चढून आल्याने दम लागला . दम्याची गोळी घेतली . ” जय नित्यानंद ” असे जोराने म्हणून परशुरामांना साष्टांग नमस्कार घातला . नित्यानंदांचा जप सुरू झाला .जप करता करता अचानक मंदिराभोवती पेटत्या मशाली घेऊन कोणीतरी प्रदक्षिणा घालू लागले . आण्णा गर्भगळीतच झाले. काय चाललंय , काय होतंय तेच कळत नव्हते . श्वापदांची हालचाल सुरू झाली . साप काय , वाघ काय ! आण्णा बेशुद्ध झाले . पहाटे पहाटे त्यांना शुध्द आली . गुरुकृपेमुळे त्यांचे केसालाही धक्का लागला नाही, हे केव्हढे आश्चर्य ! जप चालू असताना साक्षात ” परशुरामाने ” दर्शन दिले .आण्णा धन्य पावले .त्यांना अतिशय आनंद झाला .ही सर्व गुरुकृपेची महती ! गुरुवीण कोण तारील ?

घरून आम्हा कुटुंबियांचा निरोप घेताना सांगून गेले की मी सुखरूप परत आलो तर तुमचा , नाहीतर बाबांचा !

दे दयाळू आहे. तो तुमची परीक्षा पहात असतो .त्या परीक्षेत आणृणा यशस्वी झाले व सुखरूप घरी आले .गुरुंनी आज्ञा केल्यानंतर सर्व जबाबदारी तेच घेतात त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवून आचरण ठेवावे .गुरुंना आपली काळजी !

तर असे हे आमचे बाबा !
जय श्री नित्यानंद !

काळ” आला पण “वेळ” आली नव्हती

प.पू.बाबांनी समाधि घेतल्यानंतरचा हा अनुभव मी सांगत आहे .
आण्णा सातत्याने बाबांचा जप करीत असत. मे १९७१ ते १९७३ असे दोन -अडीच वर्षे आण्णांचे वास्तव्य गणेशपुरीतील पोलीस बिल्डींगच्या शेजारील “वैकुंठ” ह्या घरात जप करणेसाठी वास्तव्य होते . बाबांनी देह ठेवल्यानंतर आण्णांना अनेक वेळा दृष्टांत देऊन , प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांचेवर कृपादृष्टी ठेवली .

पूर्ण दिवस-रात्र आण्णा जप करीत असत .एकदा रात्रौचे वेळी
दरवाजा आतून बंद होता. आण्णा जप करीतच होते . थोड्यावेळाने उतार वयामुळे थकल्याने झोपी गेले . पहाटे त्यांना जाग आली . पहातात तो दार सताड उघडे ! पाहिले तर
संपूर्ण दारात दोन हा लांब करून
काळाकभिन्न प्रचंड देह असलेली व्यक्ती दरवाज्याच्या बाहेरूनच आण्णांना विचारू लागली , ” मी
आता येऊ ? ” ते पाहताच क्षणी आण्णा बेशुद्ध झाले. जेव्हा शुध्द आली, पाहिले तर अंथरुण ओलेचिंब व साक्षात बाबा समोर ! व हिंदी भाषेत जोराचा ध्वनी आला , ” खबरदार , मेरे भक्त के घर में पांव रखोगे तो ! व
आण्णांकडे पाहून हसून , मी येथे आलो होतो हे आता कोणाला सांगू नकोस असे तोंडावर बोट ठेऊन सांगितले .अण्णांचे अंथरुण ओले होण्याचे कारण म्हणजे पहाटे बाबा कुंडावर स्नान करून तसेच थेट आण्णांकडे आले . किती भक्ताची काळजी !
त्यावेळी काळ आण्णांना न्यायला आला होता पण त्यांची वेळ आली नव्हती . अशा प्रकारे बाबांनी आण्णांना दोन वेळा जीवदान दिले . ( एकदा रेल्वे रूळ क्रोस करताना‌ व आता )

धन्य ती माऊली !

Passing of Shri Mehunkar

५ डिसेंबर , १९८६ ! आमचे आयुष्यातील दु:खाचा क्षण . माझे आण्णांनी या जगाचा निरोप घेतला .

ते गेले तो दिवस मार्गशीर्ष चतुर्थी ! मार्गशीर्ष पहिला गुरुवार होता .१० व्या दिवशी पिंडदानाला आम्ही स्मशानाच्या
धर्मशाळेत गेलो जेथे त्यांचे विधी चालणार होते .त्यावेळी धर्मशाळेत सर्व देवांच्या टाईल्स ( फोटो ) होते . महत्वाचे व आश्चर्य म्हणजे आण्णांचे विधी गुरूजी जेथे करीत होते तेथेच
पण.पू.नित्यानंथ बाबांच्या फोटोंची टाईल होती . आमचे डोळे आनंदाश्रू ने भरून आले .
जणू बाबा सांगत होते , ” दु:ख करु नका , तो माझे चरणाशीच विलीन झाला आहे .” आम्हाला अत्यानंद झाला .पिंडासाठीही वाट पहावी लागली नाही .ठेवतो न ठेवतो तोच कावळ्याने झडप घातली . बरे ! १३ व्या दिवशी “दत्तजयंती ! ” म्हणजे आण्णा गेल्यापासून ते दिवस कार्य संपेपर्यंत सर्व चांगले दिवस होते . माझे आण्णा पुण्यवानच होते .

कै.ती.आण्णांना आमचे कोटी कोटी प्रणाम !